Aaditi tatkare Ladaki Bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात हस्तांतर झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 3000 आणि 7500 जमा झाले आहेत. अशाप्रकारे तब्बल 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. या दरम्यान अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. पण त्यांच्या खात्यात एकही रूपया आला नाही आहे. त्यामुळे या महिलांचे नेमके पैसे गेले कुठे? हे जाणून घेऊयात.
लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात
लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात
पैसे बँकेत जमा झाले की नाही असं करा चेक
गुगलवर जाऊन तुम्ही MyAadhar टाईप करा. त्यानंतर आधारची साईट ओपन होईल.
नवीन पेज उघडल्यावर सर्वांत खाली Bank Seeding Status पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला आधारकार्ड आणि कॅप्चा भरण्याचा पर्याय येईल.
हा कॅप्चा भरल्यावर तुम्हाला Otp येईल. हा ओटीपी भरायचा आहे.
त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि तुमचं आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे. याची माहिती देण्यात येईल.
जर बँकेची नावाचा रकाना रिकामी असेल तर कोणतंच बँक खातं लिंक नाही. त्यामुळे तुम्हाला ते लिंक करून घ्यावं लागेल.